All about cricket.
क्रिकेट -CRICKET क्रिकेट : एक लोकप्रिय सांघिक खेळ. हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असून तो इंग्लंडप्रमाणेच भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व न्यूझीलंड ह्या राष्ट्रकुलातील देशांतही लोकप्रिय आहे. ह्या सात देशांमध्ये क्रिकेटचे अधिकृत कसोटी सामने होतात. खेळाचे मैदान : ह्या खेळासाठी मोठ्या गोलाकार मैदानात मधोमध २०·११ मी. (६६ फूट) लांब व ३·०४ मी. (१० फूट) रुंद अशी खेळपट्टी तयार करण्यात येते. खेळपट्टी दोन प्रकारची असते : एकात खेळपट्टीवर हिरवळ असते, तर दुसऱ्या प्रकारात खेळपट्टीवर चटई (मॅटिंग) अंथरली जाते. खेळपट्टीच्या मध्यबिंदूपासून मैदानावर ६८·५८ मी. (७५ यार्ड) अंतरावर गोलाकार सीमारेषा आखली जाते. सीमारेषेचे अंतर जास्तीत जास्त ६८·५८ मी. असावे, असा प्रायोगिक नियम आहे. ह्या सीमारेषेच्या कक्षेतील भाग म्हणजे क्रिकेटचे एकूण क्षेत्र (फील्ड) होय. सीमारेषा लांबून दिसावी, म्हणून तिच्यावर पांढरी फक्की टाकली जाते किंवा दोर बांधण्यात येतो. तसेच ठराविक अंतरावर निशाणे ठोकली जातात. खेळाचे साहित्य: यष्ट्या, चेंडू, बॅट व संरक्षक साधने मिळून क्रिकेटचे साहित्य ब...